
निळी साडी, पांढरा स्लीव्हलेस ब्लाऊज आणि चेहऱ्यावर गोड हास्य... सोशल मीडियावर सध्या मराठमोळी अभिनेत्री गिरीज ओक गोडबोले भलतीच व्हायरल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे अनेक फोटो समोर येत असून ती रातोरात 'नॅशनल क्रश' बनली आहे.

एका मुलाखती दरम्यानचा गिरीजाचा हा लूक लोकांना खूप आवडला . मराठमोळ्या प्रेक्षकांसाठी गिरीजाचं नाव नवं नसलं तरी इतरांना मात्र ती फारशी माहीत नव्हती. त्यामुळे निखळ हास्याने सर्वांना भुरळ पाडणाऱ्या गिरीजाबद्दल सगळं काही जाणून घेण्यास अनेक जण उत्सुक आहेत.

मराठी चित्रपट, ओटीटी, नाटक, मालिका गाजवणाऱ्या गिरीजाचा पहिला चित्रपट कोणता हे अनेकांना माहीत नसेल. 2004 साली आलेल्या 'मानिनी'या चित्रपटातून गिरीजाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्यासोबत स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका होती. तसेच मनोज बिडवई, दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर, इला भाटे आणि तनाझ इराणी हेही या चित्रपटात झळकले.

बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल किंवा लक्षात आलं नसेल पण गिरीजा ओक हिने अनेक हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. काही काळापूर्वी आलेल्या शाहरूख खानच्या 'जवान' चित्रपटात ती झळकली, तेव्हा अनेकांनी तिला नोटीस केलं असेलच. पण त्याआधी तिने बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट अभिनेता, अर्थात आमिर खान याच्यासोबतही काम कें आहे.

2007 साली आलेल्या 'तारे जमींन पर' या चित्रपटात आमिर खान याची महत्वाची भूमिका होती, एका शिक्षकाच्या रोलमध्ये तो दिसला होता. त्याच चित्रपटात गिरीजाही होती. अनेकांना हे आठवत असेल, तीच गिरीजा आता नॅशनल क्रश बनली आहे.

गिरीजाने झेंडे चित्रपटात मनोज वाजपेयीच्या पत्नीची भूमिका निभावली होती. आता ती लवकरच 'कांतारा : चाप्टर वन' फेम अभिनेता गुलशन देवैय्या याच्यासोबत 'थेरपी शेरपी' या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. याआधी