
अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या बोल्डलूकमुळे कायम चर्चेत असलेली पाहायला मिळते. तिच्या लूकच चाहत्यांकडून कौतुकहोत असताना नेटकऱ्यांकडून अनेकदा ती ट्रोल ही होताना दिसते. प्राजक्ताने नुकतेच आपल्या ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

‘प्लॅनेट मराठी’वरील ‘रानबाजार’ या मराठी वेबसीरिज मधून प्राजक्ता माळी व तेजस्विनी पंडित प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत . या वेब सिरीज च ट्रेलर रिलीज झाला आहे.

या वेब सीरिज मधून प्राजक्ता माळीचा सर्वात बोल्ड अंदाज पाहून प्रेक्षकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. 'तुला हे शोभत नाही', 'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती,' अशा काय काय प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

वेब सिरीज मध्ये प्राजक्ता माळीने एका वेश्याची भूमिका साकारली आहे. टिझरमध्ये तिचा प्रणय प्रसंगातील सिन समोर आला. अत्यंत बोल्ड अशा या सिनमुळे चाहते नाराज झाले.