दोन्ही नवऱ्यापासून का घेतला घटस्फोट? शेवटी श्वेता तिवारीने सांगूनच टाकलं, म्हणाली…
अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकतेच करण जोहरच्या 'द ट्रेटर्स' या रिअॅलिटी शोमध्ये दोन्ही माजी पतींबद्दल मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. करण जोहरच्या 'द ट्रेटर्स' या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वाच्या ट्रेलरमध्ये श्वेताने तिच्या दोन्ही माजी पतींबाबत मोठा खुलासा केला आहे.

ट्रेलरमध्ये श्वेता म्हणते, 'मीच माझ्या दोन्ही पतींना मला फसवताना रंगेहात पकडलं होतं' तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. श्वेताने यापूर्वीही तिच्या दोन्ही माजी पतींवर कौटुंबिक हिंसाचार आणि गैरवर्तनाचे आरोप केले होते.

दरम्यान, श्वेताचा पहिला पती राजा चौधरी याने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये श्वेतावर सहकलाकारासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला होता. त्याने विशेषतः सीझेन खान यांचे नाव घेत श्वेताच्या कथित अफेअरबाबत वक्तव्य केले होते. मात्र या आरोपांवर श्वेताकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

श्वेता तिवारीने 1998 मध्ये राजा चौधरीशी विवाह केला होता. कौटुंबिक वाद, हिंसाचार आणि मतभेदांमुळे दोघे वेगळे झाले. या विवाहातून त्यांना मुलगी पलक तिवारी आहे. त्यानंतर 2013 मध्ये श्वेताने अभिनव कोहली यांच्याशी दुसरे लग्न केले.

या नात्यातून त्यांना मुलगा रेयांश झाला. मात्र हे नातेही टिकले नाही आणि 2019 मध्ये दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. श्वेताने अभिनव कोहली यांच्यावरही कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. सध्या श्वेता तिवारी सिंगल पॅरेंट म्हणून आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे.