अप्रतिम सौंदर्य, समुद्रकिनारी मराठी अभिनेत्रीचं खास फोटोशूट, सौंदर्यावरून नजर हटणार नाही

मराठी अभिनेत्री स्नेहलता वसईकरने नुकतेच तिचे थायलंडमधील फुकेतमधील खास फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Updated on: Sep 27, 2026 | 1:56 PM
1 / 5
अभिनेत्री स्नेहलता वसईकर सध्या थायलंडमधील फुकेत येथे सुट्टीचा आनंद घेत आहे. समुद्रकिनाऱ्यावर अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं असून या फोटोशूटचे काही सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

अभिनेत्री स्नेहलता वसईकर सध्या थायलंडमधील फुकेत येथे सुट्टीचा आनंद घेत आहे. समुद्रकिनाऱ्यावर अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं असून या फोटोशूटचे काही सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

2 / 5

फुकेतच्या निळ्याशार समुद्राचं आणि पांढऱ्याशुभ्र वाळूचं सौंदर्य या फोटोंमधून पाहायला मिळत आहे. या निसर्गरम्य वातावरणात स्नेहलताचा ग्लॅमरस अंदाजही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

3 / 5

या फोटोशूटसाठी तिने फिकट केशरी रंगाचा आकर्षक को-ऑर्ड सेट परिधान केला आहे. समुद्रकिनाऱ्यावर वेगवेगळ्या अंदाजात पोझ देत स्नेहलताने हे फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

4 / 5

'निसर्ग नेहमी आपल्या आयुष्यातली परिस्थिती बदलत नाही… कधी-कधी तो फक्त त्या परिस्थितीकडे पाहण्याची आपली नजर बदलतो' असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.

5 / 5

स्नेहलता वसईकरच्या या फुकेत ट्रिपचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, अभिनेत्रीचा हा निसर्गरम्य आणि ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us