
अभिनेत्री सोहा अली खान आज (4 ऑक्टोबर) आपला 42वा वाढदिवस साजरा करत आहे.

नवाबी घराण्यात जन्मलेल्या सोहाने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटीकल सायन्समधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.

पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

यानंतर भारतात परतून तिने फोर्ड फाउंडेशन आणि सिटी बँकमध्ये नोकरीदेखील केली.

2004मध्ये बंगाली चित्रपट ‘इति श्रीकांता’मधून तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केले.

शाहीद कपूरसोबत ‘दिल मांगे मोर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

तिचा ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट खूप गाजला.

2015मध्ये सोहाने अभिनेता कुणाल खेमुसह विवाह केला.

2017मध्ये ‘इनाया’च्या जन्मानंतर तिने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला.

सध्या ती कुटुंबासोबत व्यस्त असून, पुस्तक लेखनदेखील करत आहे. लेक इनायाने तिला मिठी मारत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.