
अभिनेत्री सनी लिओन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या लूकने चाहत्यांना वेड लावते. सनीने सोशल मीडियावरग्लॅमरस स्टाईलमधील काही फोटो शेअर केले आहेत .

या फोटोंमध्ये सनी लिओनी केशरी रंगाचा प्रिंटेड शॉर्ट शर्ट आणि स्कर्टमध्ये अतिशय किलर पोझ देताना दिसत आहे. या आऊटफीटसोबत तिने स्मोकी मेकअप, गळ्यात चेन, कानातले आणि सँडलने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Hey hey!! असे कॅप्शन देता तिने फोटो शेअर केले आहेत. सनी लिओनीचा हा ड्रेस मेराकी कोचरमधून घेतला आहे, तिचे कानातले ब्लिंग थिंग स्टोअरमधून घेतले आहेत.

सनी लिओनच्या या फोटोवर चाहत्यांनी हॉट, सुंदर, फायरच्या इमोजी शेअर केल्या आहेत. सनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सनीने वेगवेगळ्या फोटोंमध्ये कॅमेऱ्यासाठी वेगवेगळ्या अँगलमध्ये पोझ दिल्या आहेत. फोटोमध्ये ती आपली बॉडी फ्लॉंट करताना दिसून आली आहे.