सनी लिओनीची ‘ती’ गोष्ट कळताच हादरले कुटुंब, वडीलही प्रचंड रडले, आईने थेट विचारलं…
'तू खरंच कपड्यांशिवाय काम केलंस का?' सनी लिओनीबद्दल जेव्हा घरच्यांना समजलं तेव्हा कुटुंबाला बसलेला मोठा धक्का. लपून-लपून रडायचे वडील. नेमकं काय घडलेलं?

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी प्रौढ मनोरंजन क्षेत्रात काम केले होते. तिच्या 'करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' या बायोपिक वेब सिरीजमध्ये तिने आयुष्यातील अनेक भावनिक आणि कठीण प्रसंगांचा खुलासा केला आहे.

सनीने सांगितले की, तिने अडल्ट इंडस्ट्रीत प्रवेश केल्याचे जेव्हा आई-वडिलांना समजले, तेव्हा संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. तिची आई रडत म्हणाली, 'तू खरंच कपड्यांशिवाय काम केलंस का?' तसेच तिने सनीच्या स्क्रीन नेमवरही नाराजी व्यक्त केली.

वडिलांनीही इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबाशी चर्चा न केल्याबद्दल खंत व्यक्त केली. मात्र, अखेरीस त्यांनी मुलीचा निर्णय स्वीकारत तिला यशस्वी होण्याचा सल्ला दिला. सनीने कबूल केले की, या क्षेत्रात जाण्याचे मुख्य कारण आर्थिक स्वावलंबन आणि मोठी कमाई हे होते.

त्या काळात आठवड्याला 10 ते 15 हजार डॉलर मिळू शकत असल्याने तिने हा मार्ग निवडला. मात्र, या निर्णयामुळे नातेवाईकांनी तिच्या कुटुंबाशी संबंध तोडले आणि आई-वडिलांना समाजाच्या टीकेचा सामना करावा लागला.

सनीच्या मते, तिच्या आई-वडिलांना या निर्णयामुळे मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. वडील अनेकदा लपून रडायचे तर आईही सत्य समजल्यानंतर खूप व्यथित झाली होती. तरीही सनी आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि नंतर 2012 मध्ये 'जिस्म 2' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.