
ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री सुजैन बर्नट हिच्या आयुष्यात सहा महिन्यांपूर्वी दु:खाचा डोंगर कोसळला. ‘3 इंडियन्स’ अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन झाले.

पतीच्या निधनानंतर सुजैन बर्नट ही तुटलेली दिसली. मात्र, पतीच्या निधनाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आता अभिनेत्री ही दुसऱ्यांदा प्रेमात पडल्याचे बघायला मिळतंय.

सुजैन बर्नट हिने सोशल मीडियावर आपल्या नव्या पार्टनरसोबतचा फोटो शेअर केला. दिल्लीमध्ये राहणारे बिझनेसमॅन अर्जुन यांच्यासोबतचा सुजैनने फोटो शेअर केलाय.

सुजैन आणि अर्जुन यांची पहिली भेट ही एका पार्टीत झाली. त्यानंतर ते चांगले मित्र होते. सुजैनने हे देखील सांगितले की, अर्जुनची जागा आपल्या आयुष्यात दुसरे कोणीच घेऊ शकत नाही.

अखिल मिश्राच्या निधनानंतर सुजैन बर्नट पूर्णपणे तुटलेली दिसली. आता आयुष्यात परत एकदा पुढे जाताना सुजैन बर्नट ही दिसत आहे.