वनिता खरातने केले 24 किलो वजन कमी, थेट म्हणाली, मी..
वनिता खरात हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. वनिता खरातने नुकताच मोठा धमाका केला. वनिता खरातने आपले तब्बल 24 किलो वजन कमी केले. काही महिन्यात तिने हे वजन कमी केले. खास डाएट फॉलो करत हे वजन कमी केले.

वनिता खरात हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. वनिता खरात हिने तब्बल 24 किलो वजन कमी केले. व्यायाम, डाएटवर भर देऊन तिने हे वजन काही दिवसात कमी केले.
नुकताच वनिता खरात हिने म्हटले की, माझे 24 किलो वजन मी कमी केले. मी आता मासेही खात नाही. पण मी आज खाणार कारण माझा चीट डे आहे. त्यामुळे आता मी हे सर्व खाणार. वनिता म्हणाली की, मला मासे खायला आवडतात.
मला पिठीभात तर प्रचंड आवडतो. भाजलेला बांगडा तर अप्रितम लागतो. मला माझ्या आईने बनवलेले जेवण प्रचंड आवडते. मला मासे खूप जास्त आवडतात.
जेव्हा मी माझ्या घरी जाते, त्यावेळी मी माझ्या आईने बनवलेले माशांचे कालवण खाते. मला ते खूप जास्त आवडते. माझी आई जे काही बनवते, ते सर्व मला आवडते. वनिता खरात हिने अनेक माशांची नावे घेतली, जी तिला प्रचंड आवडतात.
वनिता खरात ही म्हणाली की, मी लवकरच सांगेल की, मी नक्की काय काय केले आणि काय फॉलो केले, ज्यामुळे माझे वजन कमी झाले. वनिता खरात हिने इतके जास्त वजन कमी केले की, सर्वांना धक्का बसला.