
शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत.

आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल झाले त्यावेळी त्यांच्या स्वागताला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.

त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ज्ञानदास महाराज यांची जाऊन भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले.

आदित्य ठाकरे यांनी हनुमान गढीवर दाखल होत, या ठिकाणीही दर्शन घेतले.

त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी काही साधू, महंताच्याही भेटीगाठी घेतल्या.

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावेळी शिवसेनेचे वरीष्ठ नेते हे सतत आदित्य याच्याबरोबर होते.

यावेळी आदित्य ठाकरे यांना काही दिवसांच्या प्रतिमा आणि ग्रंथही देण्यात आले.

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.