
दरवर्षी विजयादशमी किंवा दसरा हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रभु श्रीरामाने लंकेचा राजा रावणाचा वध केला. मंदोदरी व्यतिरिक्त रावणाच्या किती बायका होत्या आणि रावणाच्या मृत्युनंतर मंदोदरीचे काय झाले ते जाणून घेऊया.

रावणाच्या दोन मुख्य पत्नी होत्या : मंदोदरी आणि धन्या मालिनी. मंदोदरी ही राक्षस राजा मायासुराची मुलगी आणि रावणाची पत्नी होती. धन्या मालिनी ही त्याची दुसरी पत्नी होती. रावणाला तिसरी पत्नी देखील होती, जिला त्याने मारले.

मंदोदरी ही तिच्या मागील जन्मात मधुरा नावाची एक अप्सरा होती, तिने भगवान शिव यांना मोहित करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, देवी पार्वतीने तिला 12 वर्षे विहिरीत बेडूक होण्याचा शाप दिला होता. शाप पूर्ण झाल्यानंतर, ती मायासुर आणि हेमासमोर एका सुंदर मुलीच्या रूपात प्रकट झाली, ज्याला त्यांनी दत्तक घेतले आणि मंदोदरी असे नाव दिले.

रावणाच्या मृत्युनंतर, त्याची पत्नी मंदोदरीने त्याचा मेहुणा विभीषणाशी लग्न केले. स्वतः भगवान रामाने मंदोदरीला या विवाहाचा प्रस्ताव दिलां प्रस्तावित केला आणि ते नैतिक आणि तार्किकदृष्ट्या योग्य असल्याचे स्पष्ट केले. मंदोदरीने सुरुवातीला नकार दिला , मात्र नंतर तिने हा प्रस्ताव स्वीकारला आणि विभीषणाशी लग्न केले असे म्हटले जाते.

अशाप्रकारे, मंदोदरीने लंकेचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आणि धार्मिक आणि नैतिक सुव्यवस्था राखण्यासाठी विभीषणाशी लग्न केले, कारण स्वतः भगवान रामाने म्हटले होते की, मंदोदरीने विभीषणाशी लग्न करून त्याला लंकेचा राजा बनवावे आणि राज्य स्थिर करावे.

मंदोदरी एक परोपकारी स्त्री होती आणि तिला लंकेचे कल्याण हवे होते. तिला वाटले की विभीषणाशी लग्न करून ती लंकेला योग्य दिशेने नेऊ शकेल. अशाप्रकारे, रावणाच्या मृत्युनंतर, तिचा भाऊ विभीषण भगवान रामाच्या आज्ञेनुसार लंकेचा राजा झाला. विभीषणाने लंकेवर सुजाणपणे आणि न्यायाने राज्य केले. ( Disclaimer - या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच आमचा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)