
युजवेंद्र चहलच लग्न कोरियोग्राफर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धनश्री वर्मासोबत वर्ष 2020 मध्ये झालं होतं. पण 2025 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघे वेगळे झाले. त्यानंतर चहलच नाव आरजे महावश सोबत जोडलं गेलं.

धनश्री वर्माला घटस्फोट दिल्यानंतर युजवेंद्र चहल आरजे महावश सोबत अनेकदा दिसला. त्यामुळे दोघांच्या डेटिंगच्या अफवा उडाल्या. पण पॉडकास्टमध्ये चहलने सांगितलं की, महवश फक्त त्याची मैत्रीण आहे. कठीण काळात तिने साथ दिली.

आता या दोघांनी सोशल मीडियावर परस्परांना अनफॉलो केलय. फॅन्सनी नोटिस केलय की, दोघे इन्स्टाग्रामवर आता एकमेकांना फॉलो करत नाहीत. आता चर्चा सुरु झालीय की, दोघांमध्ये काय बिनसलं?.

काही काळापूर्वी दोघे ऐकमेकांसोबत दिसत होते. आम्ही परस्परांचे चांगले मित्र आहोत असं सांगत होते. आता दोघांनी इन्स्टाग्रामवर परस्परांना अनफॉलो केलय. दोघांच्या मैत्रीत फुट पडण्यामागचं कारण काय?.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये युजवेंद्र चहल आणि आरजे महावश दोघे एकत्र दिसले. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपची अफवा पसरली. दोघांचे बरेच एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.