IND A vs SL A : ऋतुराज गायकवाडने फक्त शतकच झळकवलं नाही, तर विराट कोहलीचा हा खास रेकॉर्डही मोडला
IND A vs SL A : इंडिया-ए कडून खेळताना ऋतुराज गायकवाडने श्रीलंका-ए विरुद्ध शानदार शतक झळकावलं. त्या बळावर भारतीय-अ संघाला विजय मिळाला. या विजयासह ऋतुराज गायकवाडने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

श्रीलंका दौऱ्यावर भारतीय-अ संघाने तिरंगी वनडे मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. या विजयाचा नायक ठरला ऋतुराज गायकवाड. टीमचा उपकर्णधार असलेल्या ऋतुराजने शानदार शतक झळकावलं. या शतकासह तो लिस्ट-ए वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असलेला फलंदाज बनला आहे. (Photo: PTI)

दाम्बुला येथे श्रीलंका ए विरुद्ध हा सामना झाला. ऋतुराज गायकवाड 114 चेंडूत 101 धावांची दमदार इनिंग खेळला. टीमला त्याने अडचणीतून बाहेर काढलं. ही इनिंग ऋतुराजसाठी सुद्धा खास आहे, कारण तो लिस्ट ए करिअरमधला 100 वा सामना खेळत होता. (Photo: Sri Lanka Cricket)

100 व्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने या फॉर्मेटमध्ये लिस्ट ए मध्ये आपलं 21 वं शतक झळकावलं. या शतकासह ऋतुराज गायकवाडने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक बॅटिंग एवरेजचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. (Photo: Sri Lanka Cricket)

लिस्ट - ए क्रिकेटमध्ये कमीत कमी 50 इनिंग खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये गायकवाडची बॅटिंग सरासरी 59.3 झाली आहे. क्रिकेट विश्वातील लिस्ट ए मधील ही सर्वाधिक सरासरी आहे. या बाबतीत ऋतुराज गायकवाडने विराट कोहली (57.91) आणि ऑस्ट्रेलियाई दिग्गज मायकल बेवन (57.85) यांना मागे टाकलं. (Photo: PTI)

ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत 100 लिस्ट ए सामन्यात 96 इनिंग्समध्ये 5,161 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 21 शतकं आणि 19 अर्धशतकं झळकावली. एक द्विशतकही नाबाद 220 या इनिंग्समध्ये आहे.(Photo: PTI)