Sonam Raghuvanshi : ना सासर, ना माहेर…14 दिवस गायब असताना सोनम रघुवंशी कोणासोबत कुठे राहत होती? मोठा खुलासा

Sonam Raghuvanshi : मध्य प्रदेश इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता एक नवीन मोठा खुलासा झाला आहे. राजाची हत्या केल्यानंतर सोनम 14 दिवस गायब होती. या काळात ती कुठे? कोणासोबत राहत होती? याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत.

| Updated on: Jun 13, 2025 | 3:34 PM
1 / 10
मध्य प्रदेश इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. राजा आणि सोनम दोघे हनिमूनसाठी शिलॉन्ग येथे गेले होते.

2 / 10
तिथे सोनमने राजाची हत्या केली. त्यानंतर एक-दोन नाही, सोनम तब्बल 14 दिवस गायब होती. या काळात ती इंदूरमध्ये राहत होती. पण याबद्दल कोणालाच काही समजलं नाही.

3 / 10
राजा रघुवंशीची 23 मे रोजी हत्या केली. त्यानंतर 25 मे रोजी ती ट्रेन पकडून इंदूरला आली. राजाची हत्या केल्यानंतर कुठे आणि कसं रहायचं, याच सुद्धा प्लानिंग तिने केलं होतं.

4 / 10
म्हणूनच ठरलेल्या प्लाननुसार राजाची हत्या केल्यानंतर ती 25 मे रोजी इंदूरला आली. इथे आल्यावर ती ना माहेरी गेली, ना सासरी. तिने एक फ्लॅटवर भाड्यावर घेतलेला.

5 / 10
तिथे ती राहत होती. या फ्लॅवटर राहून ती राजा आणि तिच्या बद्दलच्या बातम्या पाहत होती. हा जो काळ होता, त्यावेळी राज आणि सोनमने परस्परासोबत जास्त वेळ घालवला.

6 / 10
या दरम्यान तिला जेव्हा समजलं की, पोलिसांना शिलॉन्गमध्ये काही पुरावे सापडले आहेत, त्यावेळी तिचा प्रियकर राज कुशवाहने इंदूर तिच्यासाठी सुरक्षित नसल्याच तिला सांगितलं.

7 / 10
म्हणून ती इंदूरवरुन राजच गाव उत्तर प्रदेश रामपूर येथे गेली. या दरम्यान पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले, त्यांनी राज कुशवाहसह तिघांना अटक केली.

8 / 10
आपले सर्व साथीदार पकडले गेलेत. आपला पर्दाफाश होणार हे तिला समजलं, त्यावेळी ती रामपूरवरुन गाजीपूरला एका ढाब्यावर निघून आली.

9 / 10
तिने बॉयफ्रेंडसोबत मिळून हा कट रचलेला. घरातून निघताना 9 लाख रुपये आणि दागिने घेऊन ती निघालेली. उद्या वेगळं रहायची वेळ आली, तर खर्च भागवताना अडचणी येऊ नये, हा त्यामागचा उद्देश होता.

10 / 10
शिलॉन्गचे डीआयजी डीएनआर मारक यांच्यानुसार सोनम तपासात चुकीची माहिती सुद्धा देत आहे. लॉकअपमध्ये अनेकदा ती इमोशनल होण्याचा ड्रामा करत आहे. ती सर्व आरोप राज कुशवाहवर टाकतेय आणि राज कुशवाह सोनमला हत्येचा मास्टरमाइंड सांगतोय.