
सर्व नैसर्गिक संकटांना तोंड देऊन.. कसे बसे खरीपातले कडधान्य, भात पीक जोमात येऊ लागले असतानाच पिकावर गोगलगायींचा उपद्रव वाढल्याने हातातोंडाशी आलेल्या भातासह इतर पिकाची नासाडी होत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

खानापूर परिसरातल्या शेतीमध्ये भल्यामोठ्या गोगलगायी सर्वत्र सोयाबीन, भुईमूग, घेवडा, झेंडू, भात पिकांमध्ये येऊन रात्रीच्या वेळी पिकांची नासाडी करीत असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

सलग चार महिने पाऊस, खरिपातील कडधान्य पिकांची रखडलेली पेरणी, अतिवृष्टीमुळे भात पिकाच्या अतोनात नुकसानीमुळे या सर्व संकटांना तोंड देऊन उरलेले कडधान्य, भात पीक जोमात येऊ लागले असतानाच पिकावर गोगलगायींचं संकट उभं राहिलं आहे.

डोळ्यासमोर पीक वाया जात असल्यानं शेतकरी हताश झाला आहे. कृषी विभागही लक्ष देत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

कृषी विभागचीचे कर्मचारी शेताकडे फिरकतही नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, त्यामुळं शेतकऱ्यांनी कृषी विभागावरही नाराजी व्यक्त केली आहे. भोरमधील विसगाव खोऱ्यातील खानापूरमध्ये गोगलगायींच्या उपद्रवाने शेतकरी हैराण