
अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सैय्यारा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटामुळे अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या केमिस्ट्रीवर चाहते फिदा झाले होते. आता नुकतंच अनीत पड्डाने अहान पांडेबद्दल एक मोठा खुलासा करत त्यांच्या खऱ्या आयुष्यातील मैत्रीची गोष्ट सांगितली आहे.

मी जेव्हा आहानला पहिल्यांदा भेटले, तेव्हाच मला जाणवलं की या व्यक्तीसोबत मी खूप कम्फर्टेबल होईल. कारण त्याचा स्वभाव खूपच मनमोकळा होतं. मी जेव्हा पहिल्यांदा मोहित सूरी आणि अहानला एकत्र भेटली, तेव्हा ती खूप नर्व्हस होती, असे अनीत पड्डा म्हणाली.

मी थोडी गोंधळत होते, माझे विनोद चालत नव्हते आणि तो बिचारा तरीही हसत होता. पण त्या भेटीने काहीतरी खास झालं होतं. त्याने गिटार वाजवला, आम्ही गाणी गायली, तो मला घरी सोडायला आला तेव्हा कारमध्ये खूप गप्पा मारल्या आणि तेव्हाच मला वाटलं की हा माणूस खूपच छान आहे, त्याची एनर्जी खूप आवडली.” असा किस्सा अनीत पड्डाने सांगितला.

शूटच्या आधीच्या काही महिन्यांत आम्ही खूप चांगले मित्र झालो. खूप भेटलो. आमच्या शंका‑कुशंका, भीती शेअर केल्या. त्यामुळे सेटवर गेले तेव्हा मला खूप सुरक्षित आणि कम्फर्टेबल वाटलं, कारण आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे होतो, असेही अनीत पड्डाने म्हटले.

आमची हीच मैत्री आणि या मैत्रीची जादू केवळ अभिनयापुरती मर्यादित नव्हती. ती केमिस्ट्री चित्रपटातही दिसली. त्यामुळेच सैय्यारा हा चित्रपट सुपरहिट ठरला, असे अनीत पड्डा म्हणाली. जेव्हा दोन लोक खरोखरच चांगले मित्र बनतात, तेव्हा ऑन‑स्क्रीन केमिस्ट्री प्लॅन करण्याची गरजच नसते. जे काही होतं, ते सहज आणि नैसर्गिकपणे होतं, अशी प्रतिक्रिया अहान पांडेने दिली.

दरम्यान येत्या २० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता सोनी मॅक्सवर सैयारा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. यावेळी तुम्हाला पुन्हा आपल्या लाडक्या जोडीला पाहता येणार आहे.