
पुणे शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतुकीचा भार वाढत असल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक उत्तम पर्याय निवडला आहे.

पुण्यापासून जवळच पुरंदर येथे नवं विमानतळ स्थापन करण्याचा प्रस्ताव आता महाराष्ट्र सरकारनं मांडला आहे.

प्रस्तावित विमानतळाचे काम जलदगती व प्राधान्यक्रमाने सुरू व्हावं यासाठी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह, संरक्षण सचिव व नागरी उड्डाण सचिव उपस्थित होते.

या बैठकीचे काही फोटो स्वत: शरद पवार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहेत.