Aishwarya Rai: मध्यरात्री ऐश्वर्या राय पोहोचली एयरपोर्टवर, बच्चन कुटुंबियांच्या सूनेला असं पाहून सगळेच थक्क
Aishwarya Rai: अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील ऐश्वर्या राय हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीला मध्यरात्री विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.

- बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आजही चाहत्यांमध्ये ऐश्वर्याची क्रेझ कायम आहे.
- ऐश्वर्या हिला शनिवारी रात्री विमानतळावर स्पॉट करण्यात आलं… ऐश्वर्या हिला पाहिल्यानंतर सर्वांच्या नजर अभिनेत्रीकडे येऊन थांबल्या. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
- विमानतळावर ऐश्वर्या हिला पाहिल्यानंतर पापाराझींनी देखील तिला कॅमेऱ्यात कैद केलं. यावेळी ऐश्वर्या हिला एकटीलाच स्पॉट करण्यात आलं. तिच्यासोबत लेक आराध्या किंवा पती अभिषेक बच्चन कोणीच नव्हतं…
- असं फार क्वचितच होतं जेव्हा ऐश्वर्या हिला एकटीला स्पॉट केलं जातं. कारण अभिनेत्री कुठेही जात असली तरी, तिच्यासोबत लाडकी लेक आराध्या कायम असते. आता ऐश्वर्या हिला पाहिल्यानंतर आराध्या कुठे आहे…? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.
- ऐश्वर्याने तिच्या स्टायलिश ‘एअरपोर्ट लूक’ने सर्वांची मने जिंकली. अभिनेत्री सैल जीन्स आणि टी-शर्ट परिधान करून, त्यावर ट्रेंच कोट घालून दिसली. ऐश्वर्या कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
- गडद रंगाची लिपस्टिक, आयलायनर आणि मस्कारा लावून तिने स्वतः लूक पूर्ण केला. मोकळे सोडलेले आणि एका बाजूला भांग पाडलेले केस अशा लूकमध्ये ऐश्वर्या अतिशय सुंदर दिसत होती. तिला पाहताच चाहते आनंदाने भारावून गेले आणि तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us