
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल विमान अपघातात निधन झालं. बारामती एअरपोर्टजवळ अजितदादांच चार्टर विमान कोसळलं. हा सगळ्या महाराष्ट्रासाठी मोठा झटका आहे.

आजा बारामती विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तिथे हे अंत्यसंस्काराचे विधी सुरु आहेत. प्रचंड मोठा जनसमुदाय आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी या मैदानावर जमला आहे.

अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवारांना घेऊन आल्या. हा प्रसंग मनाला खूप वेदना देणारा होता. सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत तर सुप्रिया सुळे बहिण आहे.

सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत होत्या. ते दृश्य पाहिल्यानंतर अनेकांच मन भरुन आलं. काळीज गहिवरलं. आपले लाडके दादा अशी अकाली एक्झिट घेतील असं कोणालाच वाटलं नव्हतं.

अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली एक छाप उमटवली. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना कायम लक्षात ठेवेल. दादांसोबत ज्यांनी काम केलं, ते सुद्धा दादांना कधी विसरु शकणार नाही. माणसं जिंकणारा एक उमदा राजकरणी खूप कमी वयात गेला.