नागार्जुनच्या मुलाने 9 वर्षांनी मोठ्या गर्लफ्रेंडशी केलं लग्न; रिसेप्शनला साऊथ सुपरस्टार्सची मांदियाळी

साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा अखिल अक्किनेनी नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अखिल आणि झैनाबच्या रिसेप्शनला अनेक कलाकार उपस्थित होते.

| Updated on: Aug 13, 2025 | 7:57 AM
1 / 6
नागार्जुन आणि आमला अक्किनेनी यांचा मुलगा अखिल अक्किनेनी याने 6 जून रोजी गर्लफ्रेंड झैनाब रावदजीशी लग्न केलं. या लग्नानंतर अक्किनेनी कुटुंबीयांकडून रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं.

2 / 6
अखिल आणि झैनाबच्या लग्नाच्या रिसेप्शनला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि राजकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होते. रविवारी हैदराबादमध्ये हे रिसेप्शन पार पडलं होतं.

3 / 6
अखिल अक्किनेनीचा सावत्र भाऊ नाग चैतन्य आणि त्याची पत्नी सोभिता धुलिपालासुद्धा या रिसेप्शनला उपस्थित होते. या रिसेप्शनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

4 / 6
अखिलने यावेळी पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तर झैनाबने पीच रंगाचा गाऊन घातला होता. झैनाब ही अखिलपेक्षा वयाने नऊ वर्षांनी मोठी असल्याचं समजतंय.

5 / 6
या रिसेप्शनला साऊथ सुपरस्टार महेश बाबूचीही उपस्थिती पहायला मिळाली. पत्नी नम्रता आणि मुलीसोबत तो अखिल-झैनाबला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला होता.

6 / 6
अखिल अक्किनेनीचा याआधी दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा झाला होता. परंतु लग्नापूर्वीच त्याचं नातं मोडलं. त्यानंतर त्याच्या आयुष्यात झैनाब झाली. झैनाब ही उद्योगपती झुल्फी रावदजी यांची मुलगी आहे.