Prithvi Shaw: पृथ्वीचा स्वभाव… अवघ्या चार महिन्यात साखरपुडा का मोडला? आकृती पहिल्यांदाच मनातलं सगळं बोलली

Prithwi Shaw And Akriti Agarwal: पृथ्वी शो आणि आकृती अग्रवाल यांचा साखरपुडा अवघ्या चार महिन्यात मोडला. आता यामागील कारण आकृतीने बोलून दाखवले आहे.

| Updated on: Oct 12, 2026 | 11:40 AM
1 / 6
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आकृती अग्रवाल यांचा 8 मार्च 2026 रोजी साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. मात्र, चार महिन्यातच हा साखरपुडा मोडला.

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आकृती अग्रवाल यांचा 8 मार्च 2026 रोजी साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. मात्र, चार महिन्यातच हा साखरपुडा मोडला.

2 / 6

आकृतीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली. आता त्यांचा साखरपुडा का मोडला यावर आकृतीने पहिल्यांदा भाष्य केले आहे.

3 / 6

एका दिलेल्या मुलाखतीत आकृती म्हणाली," दोघांमध्ये कसलेच भांडण नव्हते, आजही आमचे एकमेकांवर प्रेम आहे. आमच्यात आजही बोलणं होतं, आयुष्यात काय चाललंय वेगैरे."

4 / 6

"आमच्या फॅमिली जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे आमचे कधी कधी बोलणे होते, पण काही गोष्टी पर्सनल आहेत, माझी फक्त हीच इच्छा आहे की, त्याने खूप पुढं जावं आणि चांगलं खेळावं," असं आकृती म्हणाली.

5 / 6

"मी फेमसाठी केलेले नाही. मी स्वत: माझे नाव कमावले आहे. माणूस समोरच्याचे पैसे बघत नाही, स्वभाव बघतो. लोकांना फक्त ट्रोल करता येते. नेरेटिव्ह सेट करुन ठेवतात. " असंही आकृती अग्रवाल म्हणाली.

6 / 6

दरम्यान, पृथ्वी शॉ सध्या रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहे. पृथ्वीने 70 धावांची वादळी इनिंग नुकतीच रणजी ट्रॉफीमध्ये केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us