अक्षय कुमारच्या लेकीचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, फोटो पाहताच चाहते म्हणाले, ‘इतकी मोठी झाली…’

एक काळ असा होता जेव्हा सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असायचे. पण आता सेलिब्रिटी कमी पण त्यांची मुलं जास्त चर्चेत असतात. आता अभिनेता अक्षय कुमार याच्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्याच्या लेकीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहिल्यानंतर चाहते देखील चकित झाले आहेत.

| Updated on: Jul 28, 2026 | 12:15 PM
1 / 5
अभिनेता अक्षय कुमार त्याच्या खासगी आयुष्यामध्ये एका परफेक्ट फॅमिली मॅन आहे. व्यस्त  वेळापत्रकातून वेळ वाढत अभिनेता  कायम कुटुंबाला वेळ देत असतो... आता देखील अभिनेत्याचे कुटुंबासोबत काही फोटो व्हायरल होत आहेत.

2 / 5
अक्षय कुमार याला सोमवारी रात्री पत्नी ट्विंकल खन्ना आणि लेक नितारा यांच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. अभिनेत्याला कुटुंबासोबत पाहिल्यानंतर पापाराझींनी अभिनेत्याच्या कुटुंबाला कॅमेऱ्यात कैद केलं.

3 / 5
 सध्या पत्नी ट्विंकल आणि लेक नितारा यांच्यासोबत अभिनेत्याचे फोटो सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहेत. पण सर्वांचं लक्ष अभिनेत्याच्या लेकीवर येऊन थांबलं आहे. नितारा लाईमलाईट पासून लांब असते. अशात तिचे फोटो समोर आल्यानंतर चाहते म्हणून लागलेत, ही किती मोठी झाली आहे.

4 / 5
फोटोमध्ये पापाराझींना पाहिल्यानंतर नितारा हसू लागली. अक्षयची लाडकी लेक मरून रंगाची पँट आणि काळ्या रंगाच्या टॉपमध्ये खूपच गोंडस दिसत होती. तिने मधून भांग पाडून केस मोकळे सोडत स्वतःचा लूक पूर्ण केला. चाहते निताराला तिची आई ट्विंकलची कार्बन कॉपी म्हणत आहेत.

5 / 5
अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, 2001 मध्ये अक्षय आणि ट्विंकल यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. लग्नाच्या 1 वर्षानंतर ट्विंकल हिने मुलगा आरव याला जन्म दिला. त्यानंतर 2012 मध्ये लेक नितारा हिचा जन्म झाला. नितारा आता 13 वर्षांची आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us