
जगात अशी बरीच ठिकाणं आहेत जिथे बाराही महिने बर्फ पडतच असतो किंवा जिथे ऊनच येत नाही. अशा गावांच्या, शहरांच्या अनेक गोष्टी आपण वाचल्या, पाहिल्याही असतील. पण या जगात असंही एक गाव आहे जिथे बर्फाचे माहित नाही पण गेल्या कित्येक वर्षांपासून पाऊसच पडलेला नाहीये.

हो, या गावात आजवर पाऊसच झाला नाहीये. पण अजून एक आश्चर्य म्हणजे जरी या गावात पाऊस पडला नाही तरीही या गावाचे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतं आहे. रिपोर्टनुसार, या गावात साधारण 14 दशलक्ष पाऊसच झाला नाहीये.

हे गाव आहे अल हुतैब. यमन देशाची राजधानी असलेल्या सना शहराच्या हरज क्षेत्रास हे अल हुतैब गाव वसलेलं आहे. या गावात अद्याप एकदाही पाऊस झालेला नाही.

अल हुतैब गाव डोंगरावर वसलेले असून या गावाचं सौंदर्य स्वर्गापेक्षा कमी नाहीये. या गावातील निसर्गाचा नजारा खूपच सुंदर दिसतो. हिवाळ्याच्या दिवसांत येथील वातावरण खूप थंड असतं तर, उन्हाळ्याच्या दिवसांत कडकडीत उन असतं.

हिवाळा आणि उन्हाळा हे दोन्हीच ऋतु या गावात अस्तित्वात असले तरी पावसाळा मात्र कधीच येत नाही. अल हुतैब या गावात प्राचीन व आधुनिक दोन्ही प्रकारच्या वास्तुकलेचा संगम दिसून येतो. तसेच अल हुतैब गाव समुद्रसपाटीपासून 3200 मीटर उंचीवर आहे. त्यामुळं हे गाव डोंगराच्या टोकावर आहे.

साधारणपणे ढग समुद्रसपाटीपासून 2000 उंचीवरुन वाहत असतात. त्यामुळे ढगदेखील या गावापासून कमी उंचीवर वाहतात याच कारणामुळं या गावात एकही थेंब पाऊस पडत नाही. पण असं असलं तरी हे गाव निसर्गाच्या सौंदर्याने नटलेले आहे.