
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एका प्रोजेक्टसाठी एकत्र शूटिंग करत असताना नुकतेच आढळून आले. दोघांनी काळ्या रंगाचे कॅज्युअल परिधान केले होते. गेल्या महिन्यात रणबीर आलिया लग्नबंधनात अडकले, त्यानंतर प्रथमच ते एकत्रित दिसून आले.

अयान मुखर्जीने दिग्दर्शित केलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातून ते दोघे एकत्रित प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतेच मुंबईतील फिल्म सिटी येथे ते दोघे दिसून आले.

लग्नानंतरही दोघे आपआपल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असलेले दिसून आले आहेत. वेगवेगळया ठिकाणी सुरू असलेल्या शूटिंगसाठी बिझी असलेले दिसून आले आहेत.

14एप्रिलला कुटुंबीय, मित्र परिवार व जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला होता.