
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लेकीचा आज पहिला वाढदिवस आहे. राहा ही आज एक वर्षांची झाली आहे. काही दिवसांपूर्वीच आलिया आणि राहा यांचा व्हिडीओ व्हायरल झाला.

आज राहा हिच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास पार्टीचे आयोजन करण्यात आले. नुकताच आलिया भट्ट हिने मुलगी राहा हिच्या वाढदिवसाचे अत्यंत खास फोटो शेअर केले.

या फोटोमध्ये राहा हिची झलक देखील दिसत आहे. या फोटोंमध्ये राहा ही चक्क वाढदिवसाच्या केकसोबत खेळताना दिसत आहे.

चिमुकले हात या फोटोमध्ये राहा हिचे दिसत आहेत. हे फोटो शेअर करत राहा हिने एक अत्यंत खास असे कॅप्शन देखील शेअर केले आहे.

राहा हिने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी या फोटोंवर कमेंट देखील केल्या आहेत.