
महानायक अमिताभ बच्चन - एक वेळ अशी होती जेव्हा बिग बी यांच्यावर कर्जाचं डोंगर होतं. त्या अडचणीच्या काळात ज्योतिषाने अमिताभ बच्चन यांना साथ दिली. अमिताभ बच्चन कायम नीलम, पन्ना आणि ओपल सारखी रत्ने घालतात. बॉलिवूडमध्ये बिग बी यांची जागा कोणीही घेवू शकत नाही.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा - प्रियांका चोप्राने एकदा कबूल केले की कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी ती ज्योतिषांचा सल्ला घेते. लग्नाआधीच त्यांनी ज्योतिषांशी चर्चा केली होती. प्रियांका हिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अभिनेता अजय देवगन - अजय देवगन देखील ज्योतिषावर विश्वास ठेवतो असं अनेकदा समोर आलं. सिनेमा रिलीजच्या तारखेसाठी ज्योतिषाचा सल्ला घेतो. अजय देवगन देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट - आलिया भट्ट सध्या इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या यशाचे सर्व श्रेय ज्योतिषाला जाते असे तिला वाटते. आलिया हिने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. आलिया तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस - जॅकलिनचाही ज्योतिषांवर विश्वास आहे.. असं अनेकदा समोर आलं. श्रीलंकेतून भारतात येऊन अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख तयार केली आहे. जॅकलिनला वाटते की ज्योतिषशास्त्र आपल्याला सर्वकाही समजण्यास मदत करते.