
क्लींजिंग- सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी चेहऱ्याची स्वच्छता करावी. क्लींजिंग ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. क्लींजिंगसाठी आपल्या त्वचेनुसार फेस वॉश निवडा! क्लींजिंगचे अनेक उत्तम पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.

टोनिंग- क्लींजिंग नंतर टोनिंग ही स्टेप असते. क्लींजिंग नंतर टोनिंग करा. टोनरमुळे चेहऱ्याची पीएच लेव्हल संतुलित राहते. त्वचा गोरी करण्यासाठी सुद्धा टोनिंग उपयुक्त ठरते.

सिरम त्वचेला हायड्रेट करायला मदत करते. बाजारात सीरम खूप प्रकारचे आहेत. सीरम निवडताना त्वचेचा प्रकार लक्षात घेऊनच निवडा. सीरम मध्ये असणारे गुणधर्म त्वचेला अनेक प्रकारे फायद्याचे आहेत.

मॉइश्चरायझर: क्लींजिंग, टोनिंग, सीरम या नंतर स्किन केअर रुटीन मध्ये येतं मॉइश्चरायझर! त्वचा थोडी तरी ओलसर हवी. त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू नये यासाठी मॉइश्चरायझर त्वचेला लावा. मॉइश्चरायझर ऐवजी किंवा त्याला कधीतरी पर्याय म्हणून नारळ तेल देखील लावू शकता.

सनस्क्रीन ही शेवटची पायरी आहे. कुठलीही अभिनेत्री स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीनला खूप महत्त्व देते. कुठलाही ऋतू असला तरीही सनस्क्रीन लावणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त ऊन नाही तर उष्णता, सूर्यप्रकाश या सगळ्यापासून सनस्क्रीन तुम्हाला वाचवते.