Almonds Vs Pista: बदाम वा पिस्ता थंडीत काय खाणे फायद्याचे ? पाहा सेवन करण्याची योग्य वेळ पद्धत

हिवाळ्याच्या दिवसात हवामान थंड असल्याने ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. परंतू थंडीत बदाम खाणे योग्य आहे की पिस्ता खाणे योग्य याबाबत अनेकदा कन्फ्युजन असते. तर पाहूयात बदाम की पिस्ता हिवाळ्यात खाणे जास्त फायदेशीर आहे? आणि खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत जाणून घेऊयात...

Updated on: Nov 28, 2025 | 11:20 PM
1 / 5
 बदामला सुपरफूड म्हटले जाते. थंडीत बदाम खाण्याचे खूपच फायदे आहेत. बदाम शरीराला उष्णता देते आणि थंडीपासून वाचवते. तसेच मेंदू तल्लख होण्यास देखील बदाम फायदेशीर ठरतात. बदाम इम्युनिटी मजबूत करते. हाडे आणि स्नायूंना ताकद देते. त्वचेचा रुक्षपणा कमी करते. त्वचेला चमकदार बनवत. थंडीत सकाळी रिकाम्या पोटी रोज ४ ते ५  भिजवलेले बदाम खाल्ल्याने खूपच फायदा होतो.

2 / 5
 बदाम रात्रभर भिजवत ठेवा आणि सकाळी साल काढून खा. पिस्ता थेट किंवा हलका भाजून खाऊ शकता.  थंडीत सकाळी वा दुपारी सेवन केल्याने फायदा होतो. प्रमाणापेक्षा जास्त ड्रायफ्रूटस खाणे चांगले नाही. एक दिवसात ५ ते ६ बदाम आणि ६ ते ८ पिस्ता खाणे योग्य असते.

3 / 5
जर तुम्हाला जास्त उष्णता हवी आणि ताकद हवी तर बदाम खाणे चांगले आणि जर तुम्हाला हलके, सहज पचणारे आणि हृदयासाठी फायदेमंद हवे असेल तर पिस्ता हा चांगला असतो. थंडीत सर्वात उत्तम म्हणजे दोन्ही संतुलित प्रमाणात डाएटमध्ये समाविष्ट करणे योग्य आहे. थंडीच्या हवामानात बदाम आणि पिस्ता दोन्ही आरोग्यासाठी वरदान आहेत.

4 / 5
 पिस्ता हृदयास आरोग्यदायी राखतो. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतो. शरीरात ऊर्जा वाढवतो. वजन नियंत्रणास मदत करत असतो. डोळ्याची दृष्टी चांगली ठेवण्यास मदत करतो.  पिस्ता हा हलका आणि सहज पचणारा असतो. यामुळे दिवसभर कधीही तो स्नॅक म्हणून खाऊ शकता.

5 / 5
योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी बदाम आणि पिस्त्याचे सेवन केल्याने तुम्हाला थंडीत तंदुरुस्त, उत्साही आणि निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे गरजेनुसार तुमच्या दैनंदिन दिनचर्येत हे पदार्थ समाविष्ट करा आणि आजारी न पडता हिवाळ्याचा पुरेपुर आनंद घ्या.