
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे देशातील नव्हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांच्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट अद्वितीय आणि आलिशान आहे. त्यांच्याकडे एक-दोन नाही तर अनेक खाजगी जेट आहेत. यापैकी एक प्रवासात असलेल्या 7-स्टार हॉटेलसारखे आहे. त्याचे नाव Boeing Business Jet 2 (BBJ2) आहे. रिपोर्ट्सनुसार, या जेटची किंमत ₹535 कोटींपेक्षा जास्त आहे. हे जेट फक्त प्रवासासाठी नाही; ते एक उडणारं ऑफीस, घर आणि जणू उडणारा राजवाडाच आहे.

रिपोर्ट्सनुसार, अंबानींच्या जेटमध्ये एक Full-Fledged मीटिंग रूम, राणीच्या आकाराचे बेड (Queen Size Beds) असलेले प्रायव्हेट बेडरूम, चांदीच्या कटलरीसह डायनिंग लाउंज, एक थिएटर आणि एक हाय-एंड मनोरंजन सिस्टीमही आहे. त्यात एक स्काय बाथरूम देखील आहे.

काही रिपोर्ट्सनुसार, अंबानींच्या जेटमध्ये ऑनबोर्ड शेफ आणि नोकर असतात. तिथलं जेवण 5-Star हॉटेलसारखं असतं. चहा आणि कॉफीही खूप वेगळी असते. जेव्हा अंबानी कुटुंब प्रवास करते तेव्हा त्यांना सर्व सुविधा अशा मिळतात जणू ते हवेत त्यांच्याच घरात रहात आहेत. .

अंबानींच्या जेटचे आतील भाग, अर्थात इंटिरिअर हे तज्ञ युरोपियन डिझायनर्सच्या टीमने डिझाइन केले आहे. त्यात भिंतींवर खास सिल्क वॉलपेपर, हाताने बनवलेल्या चामड्याच्या सीट्स आणि स्वारोवस्की क्रिस्टल लाइटिंगचा समावेश आहे. या जेटमध्ये अजिबात गोंधळ ऐकायला येत नाही आणि प्रवासादरम्यान, ते इतकं स्मूथली जातं तुम्हाला जेट आकाशातून उडत आहे की नाही हे देखील कळत नाही

अंबानींचे जेट फक्त प्रवासासाठी नाही तर ते एक मूव्हिंग स्टेटमेंट आहे. कधीकधी ते काही तासांसाठीच परदेशात उड्डाण करतात. एखादी महत्वाची डील साइन करण्यासाठी, एखाद्या सीक्रेट मीटिंगसाठी किंवा फॅमिलीच्या खासगी ट्रीपसाठी या जेटचा उपयोग होतो.