Donald Trump : महासंकट, ट्रम्प यांनी G 7 परिषद अर्ध्यावर सोडली, अमेरिका B-2 बॉम्बर वापरणार, त्याचा अर्थ काय?

Donald Trump : जगातली महत्त्वाची G7 परिषद अर्ध्यावर सोडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मायदेशी परतले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन तेहरान रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. हे काहीतरी मोठ घडणार असल्याचे संकेत आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी अशा पद्धतीने महत्त्वाची बैठक अर्ध्यावर सोडून निघून जाणं, याचा अर्थ अमेरिका कुठल्यातरी महत्त्वाच्या निर्णयाप्रत आली आहे.

| Updated on: Jun 17, 2025 | 1:24 PM
1 / 10
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प G7 परिषद अर्ध्यावर सोडून रात्रीच वॉशिंग्टनला परतले आहेत. व्हाइट हाऊसने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, 'मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि महत्त्वाच्या विषयांकडे ते लक्ष देणार आहेत'

2 / 10
मिडिल ईस्टमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कॅनडामध्ये आयोजित G7 शिखर सम्मेलनातून एक दिवस आधीच वॉशिंग्टनला परतले आहेत.

3 / 10
डोनाल्ड ट्रम्प यांनी तात्काळ तेहरान रिकामी करण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितलं की, 'मला लवकर परतायचं आहे'

4 / 10
कॅनडामध्ये सुरु असलेल्या G7 शिखर सम्मेलनाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी सोशल मीडिया साइट ट्रुथ सोशलवर एक पोस्ट केली.

5 / 10
Donald Trump

Donald Trump

6 / 10
ट्रम्प अन्य एका पोस्टमध्ये इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाबद्दल आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना म्हणाले की, "अमेरिका फर्स्टचा अर्थ अनेक महान गोष्टींसोबत आहे. यात इराणला अणवस्त्र मिळू नये हे तथ्य सुद्धा आहे. अमेरिकेला पुन्हा महान बनवणार"

7 / 10
डोनाल्ड ट्रम्प थेट व्हाइट हाऊसच्या सिच्युएशन रुममधील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सहभागी होऊ शकतात. इस्रायलसोबत मिळून पुन्हा एकदा इराणच्या अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ला चढवला जाऊ शकतो. अमेरिका आतापर्यंत या युद्धापासून लांब होती.

8 / 10
इस्रायलच्या हल्ल्यात इराणमधील अणवस्त्र तळ पूर्णपणे नष्ट झाल्याचे सबळ पुरावे नाहीयत. इराणवर हल्ल्यामागे तोच इस्रायल, अमेरिका उद्देश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इराणच्या अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ला चढवला जाऊ शकतो.

9 / 10
अमेरिका, इस्रायलकडून असा हल्ला होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन इराणने जमिनीखाली मजबूत बंकरमध्ये युरेनियमच संवर्धन केलं आहे. अणूबॉम्ब बनवण्यासाठी युरेनियम सर्वात महत्त्वाचा घटक आहे.

10 / 10
अमेरिकेकडे बंकर बस्टर बॉम्ब आहे, जो इतक्या खोलवर जाऊन प्रकल्प पूर्णपणे नष्ट करु शकतो. त्यासाठी B-2 बॉम्बर हे ताकदीच विमान लागेल. ते सुद्धा अमेरिकेकडे आहे. त्यामुळे अमेरिका इराणमधील अणवस्त्र तळ नष्ट करण्यासाठी हे B-2 बॉम्बर विमान वापरु शकते.