चिमुकल्याच्या हाती फुल दिलं, नंतर स्वत: मनोभावे नतमस्तक, अमित शाहांनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. गणेशोत्सवानिमित्त त्यांनी बाप्पाच्या चरणी माथा टेकवून देशवासीयांसाठी सुख-समृद्धीची प्रार्थना केली. या दर्शनावेळी त्यांच्यासोबत राज्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

| Updated on: Sep 14, 2026 | 6:04 PM
1 / 5
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्या संपूर्ण कुटुंबासह लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले. बाप्पाच्या दर्शनादरम्यान त्यांचा संपूर्ण परिवार भक्तीभावात बुडालेला पाहायला मिळाला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्या संपूर्ण कुटुंबासह लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले. बाप्पाच्या दर्शनादरम्यान त्यांचा संपूर्ण परिवार भक्तीभावात बुडालेला पाहायला मिळाला.

2 / 5

या दर्शन सोहळ्यातील सर्वात लक्षवेधी आणि भावुक क्षण तेव्हा पाहायला मिळाला, जेव्हा अमित शाह यांनी गर्दीत आपल्या नातीला मायेने वर उचलून धरले होते. बाप्पाचे दर्शन घेताना आजोबा-नातीचा हा कौटुंबिक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी मोठ्या भक्तीने नातीचं डोकं लालबागच्या राजाच्या चरणी टेकवलं. तसेच चरणावर वाहण्यासाठी हाती फुल दिलं.

3 / 5

अमित शाह यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह हेदेखील या वेळी उपस्थित होते. क्रीडा प्रशासनातील सर्वोच्च पद सांभाळणारे जय शाह यांनीही लालबागच्या राजाचे मनोभावे आशीर्वाद घेतले.

4 / 5

या हाय-प्रोफाइल दर्शन सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या तिघांनीही शाह कुटुंबियांसोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

5 / 5

अमित शाह 12 ते 14 सप्टेंबर या कालावधीत तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. लालबागच्या राजाच्या दर्शनाशिवाय त्यांनी वाशी येथील अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला हजेरी लावली आणि एशियाटिक सोसायटीला भेट दिली. इतकंच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us