अमिताभ बच्चन यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट, जया बच्चन यांनी लिहिलेली कथा, सर्व गाणी ठरलेली हिट

अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडत्या अॅक्शन चित्रपटांपैकी एक आहे. 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांनी राजकारणातील ब्रेकनंतर चित्रपटसृष्टीत दमदार पुनरागमन केले होते. या चित्रपटाशी संबंधित काही खास गोष्टी आजही अनेकांना माहिती नाहीत.

| Updated on: Nov 15, 2026 | 7:12 PM
1 / 5
या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विजय कुमार श्रीवास्तव आणि शहंशाह अशा दोन भूमिका साकारल्या होत्या. दिवसा पोलीस अधिकारी आणि रात्री अन्यायाविरुद्ध लढणारा शहंशाह अशी त्यांच्या पात्राची रचना होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विजय कुमार श्रीवास्तव आणि शहंशाह अशा दोन भूमिका साकारल्या होत्या. दिवसा पोलीस अधिकारी आणि रात्री अन्यायाविरुद्ध लढणारा शहंशाह अशी त्यांच्या पात्राची रचना होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

2 / 5

शहंशाह’ चित्रपटाची मूळ कथा जया बच्चन यांनी लिहिली होती. अभिनेत्री आणि राजकारणी असण्यासोबतच त्या लेखनही करतात. अमिताभ यांच्या व्यक्तिमत्त्वाला लक्षात घेऊन त्यांनी या कथेची मांडणी केली होती.

3 / 5

रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह’ हा चित्रपटातील संवाद प्रचंड लोकप्रिय झाला. आजही हा डायलॉग चाहत्यांच्या लक्षात आहे. या संवादामुळे चित्रपटाची लोकप्रियता आणखी वाढली.

4 / 5

चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा लोखंडी पंजा विशेष गाजला होता. त्यांचे जॅकेट आणि हा पंजा वजनाने जड असल्याचे सांगितले जाते. शहंशाहचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

5 / 5

या चित्रपटाचे बजेट जवळपास 3 कोटी रुपये होते. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने सुमारे 6 कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. 1988 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये त्याचा दुसरा क्रमांक होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us