
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही कायमच चर्चेत असते. नुकताच नव्या नवेली नंदा हिने मोठा खुलासा केलाय. नव्याचे बोलणे ऐकून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

मुलाखतीमध्ये नव्याला विचारण्यात आले की, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन आजी आजोबा. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन मामा मामी आणि बच्चन कुटुंबाची नात म्हणून तुला कधी फायदा मिळाला आहे का?

यावर स्पष्टपणे बोलताना नव्या नवेली नंदा दिसली. नव्या म्हणाली की, होय मला एका मोठ्या परिवारातील असल्याने अनेकदा त्याचा फायदा झाला आहे.

फक्त मलाच नाही तर त्यामुळे इतरांनाही फायदा झाला आहे. मला या गोष्टीचा लहानपणापासूनच फायदा मिळाला आहे. खरोखरच यामुळे मी नक्कीच आभारी आहे.

बरेच लोक अशा गोष्टी लपवतात. परंतू मला वाटते की, ते सांगणे काही चुकीचे नाहीये. नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन नेहमीच दिसतात.