
अनन्या पांडेने 2019 साली आलेल्या ‘स्टूडंट ऑफ द ईयर 2’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत करीअरची सुरूवात केली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांत काम केले. (Photo : Instagram)

‘गहराइयां’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने पर्सनल लाइफबद्दल एक किस्सा शेअर केला होता. प्रमोशनदरम्यान दीपिका पडूकोण म्हणाली होती की, अनन्या कधीच तिला तिच्या घरी बोलावत नाही. नेहमी नकार देते.

त्याबद्दल बोलताना अनन्याने सांगितलं की, बाबांमुळे कोणत्याही मैत्रिणीला (मी) घरी बोलावत नाही. माझे बाबा (चंकी पांडे) घराच नेहमीच टॉवेलवर फिरत असतात. आता हे ऐकूनही तुम्हाला माझ्या घरी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता,असंही ती म्हणाली.

अनन्याने आत्तापर्यंत 'स्टूडंट ऑफ़ द ईयर 2’, ‘खाली पीली’, ‘पति पत्नी और वो’, ‘गहराइयां’ आणि ‘लीगर’ अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे.

सध्या अनन्या, अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्या सोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहे. त्या दोघांच्या व्हेकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते.