
क्रिकेट दिग्गजांच्या यादीमध्ये अँड्र्यू फ्लिंटॉफचं नाव घेतलं जातं. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू फ्लिंटॉफ याने निवृत्ती घेऊन बरीच वर्षे झाली आहेत. पण आता त्याच्या मुलाने आपल्या वडिलांचं नाव पुन्हा चर्चेत आणलं आहे.

अँड्र्यू फ्लिंटॉफच्या मुलाने इंग्लंड अंडर 19 आणि श्रीलंका 19 कसोटी सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली आहे. 16 वर्षीय रॉकीने 106 धावांची दमदार शतकी खेळी केली आहे.

अशी कामगिरी करणारा इंग्लंडच्या अंडर 19 संघातील सर्वात तरुण खेळाडू बनत त्याने इतिहास रचला आहे.

रॉकीच्या खेळीमुळे इंग्लंडचा संघ श्रीलंकेच्या पहिल्या डावातील धावसंख्येसमोर 324 धावांची मोठी आघाडी मिळवता आली.

रॉकी फ्लिंटॉफने 181 चेंडूत 106 धावा केल्या ज्यामध्ये त्याने 2 षटकारांसह 9 चौकार मारले. इंग्लंडच्या अंडर 19 संघाने पहिल्या डावात 477 धावा केलेल्या. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या डावात 246-7 धावा केल्या असून अजुनही श्रीलंका 78 धावांनी मागे आहे.