
अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा या मुनव्वर फारुकी याची बॉडी शेमिंग करताना दिसत आहेत. यामुळे या दोघीही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळत आहे.

मुनव्वर फारुकी याच्या केसांचा आणि वयाचा मनारा आणि अंकिता मजाक उडवत आहेत. यामुळे मुनव्वर फारुकी याचे चाहते चांगलेच संतापल्याचे बघायला मिळतंय.

मुनव्वर फारुकी हा बिग बाॅस 17 मध्ये धमाकेदार गेम खेळताना दिसतोय. मुनव्वर फारुकी याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

मुनव्वर फारुकी आणि मनारा चोप्रा यांच्यामध्ये एक खास रिलेशन हे बघायला मिळाले. इतकेच नाही तर पर्सनल लाईफबद्दल बोलताना देखील मुनव्वर फारुकी दिसला.

आता विकेंडच्या वारमध्ये सलमान खान अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांचा कशाप्रकारे क्लास लावतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.