
बिग बाॅस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झाली. मात्र, यांच्यामध्ये जोरदार वाद बघायला मिळाले. हेच नाही तर गंभीर आरोपही दोघांनी एकमेकांवर केले.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे बिग बाॅस 17 च्या घरातील वाद पाहून विकी जैन यांचे कुटुंबिय नाराज झाल्याचे देखील बघायला मिळाले.

अंकिता लोखंडे हिच्या सासूने काही आरोपही अंकिता लोखंडेवर लावले. आता नुकताच अंकिता आणि विकी जैन एक मुलाखत देताना दिसले.

यावेळी अंकिता लोखंडे हिने थेट म्हटले की, आता बिग बाॅसमध्ये अजिबात जायचे नाही. आता जर बिग बाॅसमध्ये गेलो तर पापा घरातून हाकलूनच देतील.

आता अंकिता लोखंडे हिच्या विधानाची जोरदार चर्चा ही होताना दिसत आहे. अंकिता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे.