
अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन नुकतेच आंतरराष्ट्रीय आयकॉनिक अवॉर्ड्स 2022 मध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या जोडप्याने ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

अंकिताने आपल्या सोशल मीडियावर हे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या अवॉर्ड्समध्ये अंकिता-विक्कीने सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार पटकावला आहे.

या फोटोंमध्ये अंकिता निळ्या रंगाच्या स्ट्रॅपी डीप नेक गाउन घातला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे

अंकिताने तिच्या या पोशाखासोबत सेरुलियन ब्लू टीयर-ड्रॉप इअररिंग्स, स्टेटमेंट रिंग्स यावर तिने हाय हील्सची निवड करत खास लुक तयार केला आहे

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी कॅमेऱ्यासमोर अनेक प्रेमळ पोझ दिल्या आहेत. यामध्ये दोघांमध्ये रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

हे फोटो पोस्ट करत असताना अंकिता लोखंडेने लिहिले,की "पुरस्कार जिंकणे चांगले आहे पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते एकत्र जिंकणे. सर्वोत्कृष्ट जोडप्याचा पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन ."