
कोकण हार्टेड गर्ल अर्थात सोशल मीडिया इफ्ल्युएंसर अंकिता वालवलकर... अंकिता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.

आताही तिने असेच हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. अंकिता सध्या हिमाचल प्रदेशमध्ये ट्रीपला गेली आहे. तिथले फोटो अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

जिंदगी एक सफर है सुहाना... यहाँ कल क्या हो किसने जाना.... खूपचं सुंदर संध्याकाळ..., असं म्हणत अंकिताने निसर्गाच्या सानिध्यातले फोटो शेअर केलेत. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय.

नेटकऱ्यांनी अंकिताच्या फोटोंवर कमेंट केली आहे. किती छान... एवढ्या सुंदर ठिकाणी तू फिरायला गेली आहेस, अशी कमेंट अंकिताच्या चाहत्याने केली आहे.

ब्युटि'फुल' असं म्हणत अंकिताने हे खास फोटो शेअर केलेत. तिच्या या फोटोवर वा खरंच ब्युटि'फुल'..., अशी कमेंट नेटकऱ्याने केली आहे. पावसाच्या दिवसात अंकिता निसर्गाच्या सानिध्यात ट्रिप इन्जॉय करतेय.