Antilia House Helper Salary: अंबानीच्या घरी भाजीपाला साफ करणाऱ्याचा पगार किती?
Antilia House Helper Salary: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमधील एक नाव म्हणजे मुकेश अंबानी. ते कुटुंबीयांसोबत मुंबईतील अँटिलिया घरात राहतात. त्यांच्या घरात काम करणाऱ्यांचा पगार किती असेल? चला जाणून घेऊया...

जरा विचार करा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या आलिशाय घरातची काळजी घेण्यासाठी किती लोक काम करत असतील? तेथे काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराचा पगार किती असेल? साधातले साधे काम करण्यासाठी देखील किती मोबदला मिळत असेल? असे अनेक प्रश्न सर्वांना पडतात. चला जाणून घेऊया अँटिलियामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला किती पगार असेल? वाचा...
अंबानी कुटुंबिय हे अँटिलिया या आलिशान आणि लग्झरी घरात राहतात. या घराची किंमत जवळपास 1500 कोटी रुपये आहे. या घराचा प्रत्येक कोपरा हा विशेष डिझाइन करण्यात आला आहे. त्याची देखरेख करण्यासाठी देखील विशेष लोक नेमण्यात आली आहेत.
अंबानीच्या घरी रोज वेगवेगळे पदार्थ बनतात. अँटिलियामध्ये काम करणारे शेफ भारताच्या विविध राज्यांतील आहेत, जे त्या-त्या भागातील पदार्थ अस्सल पारंपारिक पद्धतीने बनवण्यात माहीर आहेत. ते कुटुंबातील सदस्यांना जे काही खाण्याची इच्छा होते, ते सर्व पदार्थ घरातील किचनमध्येच ताज्या स्वरूपात बनवून देतात.
प्रत्येक भाजी, चपाती बनवण्यासाठी एका विशेष कुकसोबत एक हेल्परदेखील असतो. या हेल्परलादेखील लाखो रुपये पगार मिळत असल्याचे बोलले जाते.
अँटिलियामध्ये शेफसोबत काम करणाऱ्या हेल्परला भाजी साफ करणे, पिठ मळणे, हवे असलेले जेवणाचे पदार्थ काढून देणे यासारखी कामे असतात. या हेल्परला 50000 ते 100000 रुपये पगार आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.