Tv Actress : समुद्रकिनारी टिव्ही अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज, बिकीनीतील ‘ते’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल
एक टिव्ही अभिनेत्री तिच्या बीचवरील फोटोंमुळे चर्चेत आली आहे. तिने परिधान केलेली रंगीबेरंगी बिकिनी आणि त्यातील ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बालवीर या मालिकेत मेहेरची भूमिका साकारलेली टिव्ही अभिनेत्री अनुष्का सेन सध्या तिच्या समुद्रकिनाऱ्यावरील फोटोंमुळे चर्चेत आली आहे. कॅलिफोर्नियातील 'न्यू पोर्ट बीच'वर सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
निळाशार समुद्र,समुद्राच्या लाटा आणि मोकळं आकाश अशा सुंदर वातावरणात अनुष्का वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अनुष्काने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती रंगीबेरंगी बिकीनीमध्ये दिसत आहे. त्यासोबतच काळ्या रंगाचा सनग्लासेस, मोकळे केस आणि चेहऱ्यावर सुट्टीचा आनंद दिसत आहे.
कधी ती समुद्राच्या लाटांमध्ये उभी राहून फोटो काढताना दिसते, तर कधी वाळूवर निवांत बसून सु्ट्टयांचा आनंद घेताना दिसते. काही फोटोंमध्ये ती समुद्राकडे पाहत आहे, तर काहींमध्ये कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहेत. तिने घातलेली रंगीबेरंगी बिकीनी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या फोटोंसोबत अनुष्काने 'ऑलवेज अ बीच बेब' असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी हॉर्ट आणि फायर इमोजीसह प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अनुष्का 2026 च्या न्यू पोर्ट बीच फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. तिचा कोरीयन चित्रपट 'जेजू ओले' या महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला.
हिंदी सिनेमे आणि टिव्ही मालिकांमध्ये काम केल्यानंतर 'जेजू ओले' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली ओळख निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे.