Bigg Boss Marathi 6 : सर्वांना वाटलं ट्रॉफी जिंकणार, पण टॉप 4 मधूनच एक्झिट

Bigg Boss Marathi 6 : जी स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी घरी घेऊन जाणार, असं अनेकांना वाटत होतं, त्याच स्पर्धकाला टॉप 4 मधून बाहेर पडावं लागलं. हे नाव ऐकताच बिग बॉसमधल्या सदस्यांनाही धक्का बसला.

| Updated on: Apr 19, 2026 | 10:30 PM
1 / 5
'बिग बॉस मराठी 6'च्या घरात शंभर दिवस पूर्ण करून सोशल मीडिया इन्फ्लुन्सर अनुश्री माने घराबाहेर पडली. टॉप 4 स्पर्धकांबद्दल तिने बाजी मारली होती. मात्र ट्रॉफी जिंकण्यापूर्वीच तिला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं. अनुश्री या सिझनमधील सर्वांत तगड्या स्पर्धकांपैकी एक होती.

2 / 5
घरातून बाहेर पडल्यानंतर अनुश्री म्हणाली, "प्रवास छान होता, मी बिनधास्त राहिले. मला जेवढं डोकं तेवढं वापरून मी गेम खेळायचा प्रयत्न केला. शेवटी नशिबाचा खेळ असतो. पण ठीक आहे. आयुष्य इथेच थांबत नाही. पुढे अजून बऱ्याच गोष्टी आहेत."

3 / 5
टॉप 5 स्पर्धकांमध्ये असताना अनुश्रीसमोरही ब्रीफकेसची ऑफर होती. मात्र पाच लाख रुपये तिने नाकारले. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर तिला एक लाख रुपये बक्षीस म्हणून मिळालं. अनुश्री यंदाचा सिझन जिंकेल, असं अनेकांना वाटत होतं. परंतु टॉप 4 पर्यंत तिचा प्रवास राहिला.

4 / 5
अनुश्री माने ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि डान्सर आहे. बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वीच तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग होता. आता इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या 17 लाखांवर पोहोचली आहे. अनुश्री घराबाहेर गेल्याचं समजताच विशाल कोटियनला अश्रू अनावर झाले.

5 / 5
अनुश्रीच्या नावाची पाटी काढताना विशाल म्हणाला, "खूप छान खेळलीस." बिग बॉसच्या घरात विशाल आणि अनुश्री यांच्यात खूप चांगली मैत्री जमली होती. त्यामुळे अनुश्री घराबाहेर गेल्याचं कळताच विशालला खूप दु:ख झालं.

Follow Us