
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री अपूर्वा नेमाळकर सोशल मीडियावर सक्रिय असते. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून प्रसिद्धीस आलेल्या अपूर्वाने नेमाळकर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भगवान श्रीकृष्णाचा अवताराचा खास लूक तयार केला आहे. या लूकमधील हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

श्रीकृष्णाच्या लुक सोबत अपूर्वाने खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले आहे की भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधीपासूनच त्याचे शत्रू त्याला मारण्यासाठी टपून बसलेले होते. परंतु श्रीकृष्णाने मात्र सर्व संकटांवर मात करून श्रावण कृष्ण अष्टमीला मध्यरात्री जन्म घेतला. हाच दिवस आपण जन्माष्टमी म्हणून साजरी करतो.

जी व्यक्ती धर्म, सत्य व न्यायाच्या बाजूने आहे केवळ तीच व्यक्ती योग्य आहे असे श्रीकृष्णाने सांगितले आहे. महाभारत काळापासून आजपर्यंत युद्धात ज्याप्रमाणे कपट होते त्याला सरळमार्गाने उत्तर देता येत नाही. अशावेळी जशास तसेच उत्तर द्यावे लागते. नाठाळाच्या माथी काठीच हाणावी लागते. कपटी माणसाला त्याच्याच भाषेत उत्तर दिले तरच तो वठणीवर येतो

यासाठी कृष्णनीतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे आपल्या ध्येयापासून भरकटलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने ज्ञान देऊन पुन्हा योग्य मार्गावर आणले होते

त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने तुम्हाला तुमच्या जीवनात योग्य मार्ग दाखवावे हीच त्या केशवाचे चरणी प्रार्थना आहे. श्रीकृष्णाच्या उपदेशांनी तुमचे जीवन उजळून निघावे असे तिने लिहिले आहे. ( सर्व फोटो अपूर्वा नेमाळकर इंस्टाग्रामवरून साभार )