
अरबाज खान हा त्याच्या दुसऱ्या लग्नापासून सतत चर्चेत आहे. अरबाज खान याने काही दिवसांपूर्वीच शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट नेमक्या कोणत्या कारणाने झाले हे कळू शकले नाही. परंतू पहिल्यांदाच घटस्फोटाबद्दल बोलताना अरबाज खान हा दिसलाय.

मुलगा अरहान खान याच्या शोमध्ये अरबाज खान पोहचला होता. यावेळी घटस्फोटाबद्दल बोलताना अरबाज खान हा दिसलाय. अरबाज खान म्हणाला की, कोणतेच रिलेशन हे एकाच्या प्रयत्नाने चालत नाही.

पुढे अरबाज खान म्हणाला, बऱ्याच वेळा रिलेशनशिपमध्ये प्रेशर येते. काही लोक नात्यामध्ये फक्त अपेक्षा ठेवतात. ते विचार करत नाहीत की, समोरच्या व्यक्तीच्या पण काही अपेक्षा आहेत.

या अशा रिलेशनचा काहीच उपयोग नसल्याचे सांगताना अरबाज दिसला. अशा रिलेशनला थांबवणेच हाच चांगला पर्याय असल्याचे सांगताना अरबाज खान हा दिसला.