महाराष्ट्रभूषण पुरस्कार स्विकारताना आज माहेरी आल्यासारखे वाटतंय – आशा भोसले

| Updated on: Mar 25, 2023 | 8:09 AM

आशाताईंमुळे महाराष्ट्रभूषण पुरस्काचा गौरव वाढला आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी आपल्या वाटचालीत संघर्ष अनुभवताना दुसऱ्यांचा संघर्ष गीतातून आनंदी केला. त्यांनी गायलेली गीते आजही ताजीतवानी वाटतात. ही गाणी सर्वांना प्रेरणादायी ठरतील- मुख्यमंत्री

1 / 6
गेल्या ८ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या मंगेशकर कुटुंबियांनी गायन-संगीताच्या माध्यमातून कला क्षेत्राची सेवा केली. या कुटुंबातील एक घटक असलेल्या आशा भोसले यांना महाराष्ट्रभूषण प्रदान करताना आनंद होत आहे. आशाताई महाराष्ट्राची शान आहेत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

2 / 6
आशाताईंमुळे महाराष्ट्रभूषण पुरस्काचा गौरव वाढला आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी आपल्या वाटचालीत संघर्ष अनुभवताना दुसऱ्यांचा संघर्ष गीतातून आनंदी केला. त्यांनी गायलेली गीते आजही ताजीतवानी वाटतात. ही गाणी सर्वांना प्रेरणादायी ठरतील- मुख्यमंत्री

आशाताईंमुळे महाराष्ट्रभूषण पुरस्काचा गौरव वाढला आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी आपल्या वाटचालीत संघर्ष अनुभवताना दुसऱ्यांचा संघर्ष गीतातून आनंदी केला. त्यांनी गायलेली गीते आजही ताजीतवानी वाटतात. ही गाणी सर्वांना प्रेरणादायी ठरतील- मुख्यमंत्री

3 / 6
महाराष्ट्रभूषण पुरस्कार स्वीकारताना आज माहेरी आल्यासारखे वाटत आहे. गाण्यांनी माझे जीवन समृद्ध केले असून या वाटचालीत संगीतकार आणि सह गायकांना विसरू शकत नाही. तसेच सर्व प्रकारचे संगीत आपण ऐकले पाहिजे, असे ख्यातनाम गायिका आशाभोसले यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

4 / 6
मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियावरची आजची संध्याकाळ ऐतिहासिकच होती. निमित्त होते महाराष्ट्राच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण २०२१'च्या प्रदान सोहळ्याचे...आणि पुरस्काराच्या मानकरी होत्या दिग्गज गायिका आशाताई भोसले. ज्यांच्या स्वराने जीवनातील प्रत्येक भावना आणि लाखो क्षण सुरेल केले, सोनेरी केले. विधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुलजी नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, दीपकजी केसरकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, मंगेशकर परिवारातील सदस्य, संगीत-चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर यांच्यासह असंख्य मुंबईकर भगिनी-बंधू यावेळी उपस्थित होते.

5 / 6
 'वर्सटाईल' या शब्दाची व्याख्या 'आशाताई भोसले' ही आहे. 'तोरा मन दर्पण'पासून ते 'खल्लास' ही त्यांची अफाट रेंज आहे. या रेंजमध्ये सगळ्या प्रकारची गाणी आहेत. त्यांचे वैशिष्ट सातत्याने त्यांनी जपले. 20 भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली.

6 / 6
आज धन्य झालो. आशाताईंचा सत्कार करण्याची संधी मिळाली. 1952 साली 'गेट वे ऑफ इंडिया' नावाच्या चित्रपटातील एका गाण्याच्या कोरसमध्ये आशाताई गायल्या होत्या. तिथून ते आज याच 'गेट वे ऑफ इंडिया'च्या साक्षीने त्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार स्वीकारताहेत हा थक्क करणारा प्रवास आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.