लता मंगेशकरांनी नाकारलेलं गाणं आशा भोसलेंनी गाताच ठरलं प्रचंड सुपरहिट, 58 वर्षांपासून क्रेझ कायम
58 वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांनी हे गाणं गाण्यास दिलेला नकार. आशा भोसलेंनी गाताच हे गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट. आजही या गाण्याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ. ऐकताच दिवसभर गुणगुणतात लोक.

हिंदी सिनेसृष्टीत काही गाणी अशी आहेत जी काळाच्या ओघात जुनी न होता आजही तितकीच लोकप्रिय आहेत. ‘पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ…’ हे त्यापैकीच एक गाजलेलं गाणं.
1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या शिकार चित्रपटातील हे गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आशा पारेख यांचे नृत्य, आशा भोसले यांचा दमदार आवाज आणि शंकर-जयकिशन यांचं संगीत यामुळे हे गाणं अजरामर ठरलं.
या गाण्याची आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे हे गाणं सुरुवातीला लता मंगेशकर यांना ऑफर करण्यात आलं होतं. मात्र गाण्याचे बोल त्यांना काहीसे धाडसी वाटल्याने त्यांनी ते गाण्यास नकार दिला. त्यानंतर हे गाणं आशा भोसले यांनी गायलं.
आशा भोसले यांनी आपल्या आवाजाने या गाण्याला वेगळीच ओळख मिळवून दिली. त्यांच्या या शानदार गायनासाठी त्यांना 1969 च्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला.
‘पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ…’ या गाण्याची लोकप्रियता त्याकाळीही प्रचंड होती. आजही हे गाणं ऐकलं की आशा पारेख यांचा आकर्षक अंदाज, आशा भोसले यांचा आवाज आणि शंकर-जयकिशन यांचं संगीत डोळ्यांसमोर उभं राहतं.