मी देव आहे, तुझं योनी शुद्धीकरण करावं लागेल; अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची कुंडली बाहेर काढली

कॅप्टन अशोक खरात प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'खबरदार पुढारी' दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी एका मुलाखतीमध्ये त्याचे कांड उघड केलं आहे.

| Updated on: Mar 24, 2026 | 5:39 PM
1 / 5
नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि 'कॅप्टन' म्हणून ओळखले जाणारे अशोक खरात याच्या महिलांवरील लैंगिक शोषण प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. 'खबरदार पुढारी' दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी दिलेल्या एका मुलाखतीत या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी थेट अशोक खरात महिलांना योनी शुद्धीकरण करावं लागेल असे म्हणायचे.

2 / 5
खेमनार यांच्या मते, अशोक खरातने २०० पेक्षा अधिक महिलांचे लैंगिक शोषण केले असावे, असा अंदाज आहे. या महिलांपैकी बहुतांश उच्चशिक्षित, सरकारी अधिकारी आणि राजकीय घराण्यातील असल्याचा दावा त्यांनी केला.

3 / 5
खरात स्वत:ला 'देव' म्हणवून महिलांना फसवायचा. "मी देव आहे, तुझं आयुष्य चांगलं करायचं असेल तर मी तुझं योनी शुद्धीकरण करावं लागेल" असं सांगून तो महिलांना स्वत:चं मूत्र प्यायला लावायचा, असा खळबळजनक आरोप खेमनार यांनी केला आहे. संमोहन किंवा गुंगीचे औषध देऊन लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची चर्चा असतानाही, हे अत्यंत घृणास्पद आणि अघोरी कृत्ये त्याने केल्याचे खेमनार सांगतात.

4 / 5
अशोक खरात यांची इतर फसवणुकीची प्रकरणे देखील समोर आली आहेत. एका व्यावसायिकाला धंद्यात तोटा झाल्यानंतर मार्गदर्शनासाठी खरातकडे गेला. खरातने त्याला खोटी रत्नं विकली – एक साडेतीन लाखांना आणि दुसरी दोन लाखांना. नंतर ही रत्नं खोटी असल्याचे समजले.

5 / 5
खरात स्त्री-पुरुषांना एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. एका बड्या उद्योजकाला दुसऱ्या महिलेशी संबंध जुळवून दिले. नंतर ती महिला गर्भवती असल्याचे खोटे सांगून त्या उद्योजकाला ब्लॅकमेल करून २० कोटी रुपये उकळले, असा दावा खेमनार यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us