Ashok Kharat : आई-बाबांसोबत विश्वासाने खरातकडे गेले, लिंगपिसाट भोंदूने तब्बल 6 महिने…. तरूणीने सांगितली आपबिती !
Ashok Kharat Case Nashik : महिला अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भोंदू खरातचे नवनवे कारनामे आता उघड होत चालले आहेत. त्याच्याविरोधात 7 वा गुन्हाही दाखल झाला आहे. त्यातच आता एक पीडित तरूणीने पुढे येऊन त्याच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचला आहे.

धार्मिक सल्ला, भविष्य सांगतो, तंत्र-मंत्राच्या नावाखाली साध्या भोळ्या महिलांना फसवून , त्यांचे लैंगिक शोषण करणारा, त्यांच्यावर अत्याचार करणारा नाशिकचा भोंदूबाबा खरात आता त्याच्या जाळ्यात अडकला आहे. अनेकींवर अत्याचर करून त्यांचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करणारा, त्यांना ब्लॅकमेल करून सातत्याने शोषण करणारा खरात याला पुन्हा पोलीस कोठडीत टाकण्यात आलं असून त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होते आहेत.

नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात लैंगिक शोषणाचा सातवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आता अनेक पीडिता समोर येत असून आणखी एका तरूणीने खरातवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. आधी तिने त्याच्या ऑफीस बॉयबद्दल तक्रार केली होती, मात्र आता तिने खरातवरच गंभीर आरोप केले आहेत.

आधी तिने ऑफीसबॉयवर आरोप केले होते. मात्र नंतर खरातनेच आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं सांगत तिने पोलिसांत धाव घेतली. दरम्यान काल खरातला न्यायालयासमोर हजर केल्यावर 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. एसआयटीकडून याप्रकरणात विविध अँगलने चौकशी सुरू असून खरातचे आर्थिक गैरव्यवहार, त्यात कोणाची साथ त्याला मिळाली का हेही शोधण्यात येत आहे.

हा गुन्हा करताना त्याने जुनीच पद्धत अवलंबल्याचे दिसून आलं. ही पीडिता त्याला भेटायला गेल्यावर खरातने तिलाही पेयातून गुंगीचं औषध दिलं आणि तिची शुद्ध हरपल्यावर तिच्यावर अत्याचर केले. अमली पदार्थाचा वापर करून नराधमन खरातने गैरफायदा घेतल्याचं यातूनही दिसून आलं आहे.