
आशिया कप सुपर 4 फेरीमधील दुसरा सामना बांगलादेश आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये होणार आहे. बांगलादेशसाठी हा सामना करो या मरो असा असणार आहे. कारण पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव झाला होता. त्यामुळे आजचा सामना बांगलादेशसाठी महत्त्वाचा आहे.

या सामन्याआधी बांगलादेश संघाने सराव सत्रामध्ये फलंदाजीवर काम केलेलं पाहायला मिळालं. मागील सामन्यामध्ये फलंदाजांनी निराशा केली होती. त्यानंतर गोलंदाजांनाही विकेट घेण्यात अपयश आलं होतं. त्यामुळं या सामन्यात बांगलादेश संघाचा पराभव झाला होता.

बांगलादेश संघाच्या खेळाडूंना श्रीलंकेकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढायचा आहे. आजचा सामना अटीतटीचा होईल याबाबत काही शंका नाही. हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर श्रीलंका संघाचं पारडं जड आहे.

दोन्ही संघ आतापर्यंत 52 वेळा आमने-सामने आले आहेत. यामधील 41 सामन्यांमध्ये श्रीलंका संघाने विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यामध्ये कोणता संघ विजय मिळवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश थिक्षाना, दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, कसून राजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन. आशिया कप 2023 साठी बांगलादेश टीम | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शांतो, तॉहिद हृदॉय, मुशफीकुर रहीम, मेहंदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफीफ हुसेन, शरीफुल इस्लाम, एबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.