चायनामनचा क्लास… दोन मॅच 9 विकेट्स अन् पठ्ठ्याने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, जगातील पहिला खेळाडू

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज कुलदीप यादव सध्या जोरदार चर्चेत आहे. आपल्या दमदार कामगिरीने त्याने आशिया कपमध्ये टीम इंडियाला दोन सामने जिंकून दिलेत. श्रीलंकेविरूद्ध सामन्यात ४ विकेट घेत संघाचं आशिया कपच्या फायनलचं तिकीट गड्याने पक्क केलं आहे. गेल्या दोन सामन्यात घेतलेल्या 9 विकेटसह त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

| Updated on: Sep 13, 2023 | 11:08 PM
1 / 5
कुलदीप यादव याने जेव्हा जेव्हा संधी मिळेल तिचं सोनं केलं आहे. आशिया कपमध्ये तर कुलदीप संघासाठी हुकमी एक्का ठरला आहे. कुलदीप याने दोन्ही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये संघासाठी महत्त्वाच्या विकेट्स घेत विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.

2 / 5
कुलदीप यादव याने दोन्ही सामन्यात ९ विकेट्सच्या मदतीने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव गोलंदाज ठरला आहे.

3 / 5
कुलदीप यादव याने वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 150 विकेट घेतल्या आहेत. सर्वात वेगाने 150 विकेट घेणारा तो भारताचा नाहीतर जगातील पहिला गोलंदाज ठरलाय.

4 / 5
 कुलदीप यादव – 88 सामने , अब्दुल रज्जाक – 108 सामने , ब्रॅड हॉग – 118 सामने , शकिब अल हसन – 119 सामने , रवींद्र जडेजा – 129 सामने अशी यादी आहे.

5 / 5
दरम्यान, आशिया कपच्या फायनलमध्ये कुलदीप यादवकडून अशाच सर्वोत्तम प्रदर्शनाची अपेक्षा असणार आहे. कुलदीपचा वर्ल्ड कप संघातही समावेश असल्याने त्याची रंगीत तालीमही एका अर्थाने चांगली सुरू आहे, असं म्हणता येईल.